ad headr

Powered by Blogger.

🔴ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!!! ✳️चोपडा--चोपडा तालुका आरोग्य सहाय्यक बापूसाहेब विजय योगराज देशमुख यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजारोहण; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव

चोपडा, दि. १५ ऑगस्ट ( प्रतिनिधी ) भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आशियातील एकमेव सर्वात मोठी पतसंस्था म्हणून लौकिक प्राप्त असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी), चोपडा शाखेच्या विद्याविहार येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ग.स. सोसायटीच्या चोपडा शाखेतील राष्ट्रध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी तथा आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बापूसाहेब विजय योगराज देशमुख यांना देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक ८.४५ वाजता राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.
बापूसाहेब विजय योगराज देशमुख हे तालुका आरोग्य सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, चोपडा तसेच माजी जिल्हाध्यक्ष – जि.प. आरोग्य कर्मचारी संघटना, जळगाव आणि संचालक – धन्वंतरी जि.प. तांत्रिक आरोग्य कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्या., जळगाव या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

राष्ट्रध्वजाचे विधिवत पूजन; राष्ट्रगीताने परिसर दुमदुमला.

ध्वजारोहणापूर्वी.. बापूसाहेब विजय देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला पुष्प अर्पण करून, नारळ फोडून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रध्वज आकाशात डौलाने फडकताच उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
या प्रसंगी ग.स. सोसायटीचे ज्येष्ठ मा. संचालक- तात्यासाहेब रमेश एकनाथ शिंदे, माध्यमिक पतपेढी जळगावचे मा. अध्यक्ष- भाऊसाहेब रत्नाकर हिम्मतराव बाविस्कर, ग.स. सोसायटीचे मा.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक- अण्णासाहेब सुनील अभिमन्यू सूर्यवंशी, ग.स. सोसायटी जळगाव कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष-दादासो. मंगेश रमेश भोईटे सर, ग.स. सोसायटीचे विद्यमान संचालक- दादासो. योगेश जगन्नाथ सनेर सर, स्वीकृत ग.स. संचालक- मा. भाऊसाहेब एकनाथ पाटील सर, राजेश पाटील सर, भिकन शिरसाठ सर, तसेच हिवताप कर्मचारी पतसंस्था मर्या. जळगावचे मा. संचालक बापूसो. जगदीश वाय. बाविस्कर यांच्यासह ग.स. सोसायटीचे अधिकारी-कर्मचारी व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.

यावेळी आरोग्य सहाय्यक- सुनील महाजन, सुनील भालेराव, पी.के.पाटील, आरोग्य सेवक पुष्पजीत सोनवणे, जि.प. आरोग्य कर्मचारी संघटना जळगाव,तालुका अध्यक्ष-संदीप शिंदे, नितीन चौधरी,
जि.प.कास्टाईब महासंघ संघटना, तालुका अध्यक्ष-नितीन चव्हाण, प्रशांत बोरसे, अनिल माळी, अशोक वारे, मडावी रामलू, दिनकर वाघ, विनोद पवार, डॉ. महेंद्र पाटील, एन.डी. पाटील, संजय बाविस्कर, उदय बोरसे, तसेच तालुका आशा समन्वयक सागर शिंपी, लसीकरण अधिकारी दिलवर वडवी, सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक आंबू कुमावत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कुणाल शिंदे, राजुभाऊ पवार, आरोग्य सहाय्यिका शोभा चौधरी आदींसह, आरोग्य सेवा कर्मचारी व आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या सेवाभावी कार्याला मिळाली सन्मानाची पावती.

स्वातंत्र्य दिनाच्या या राष्ट्रीय पर्वानिमित्त ग.स. सोसायटीच्या चोपडा शाखेने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीला राष्ट्रध्वजारोहणाचा मान देणे ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कोरोना महामारीपासून विविध संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, नियमित लसीकरण, माता-बाल आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, साथरोग सर्वेक्षण, आरोग्य जनजागृती, आपत्कालीन परिस्थितीतील सेवा तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या आरोग्य योद्ध्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रध्वजारोहणाच्या माध्यमातून करण्यात आला, ही बाब उपस्थितांसाठी विशेष आनंदाची ठरली.

या सन्मानामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यात जनतेला अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग.स. सोसायटी चोपडा शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. 





No comments