ad headr

Powered by Blogger.

संस्कृती माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरामेहरूण:

 
     जळगाव दि.15 ऑगस्ट ( प्रतिनिधी )
येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला. प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली  विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून के. एन. डेव्हलपर्सचे संचालक श्री. किशोरजी बेहराणी व लीनेस क्लबच्या अध्यक्षा सौ. रेश्मा बेहराणी उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि राज्यगीताच्या सुरांनी परिसर भारावून गेला.
याप्रसंगी जयदुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. जयश्रीताई सुनील महाजन, जयदुर्गा ग्रुपचे सचिव श्री. ललितभाऊ धांडे, माननीय ज्ञानेश्वर दादा नाईक, श्री. अनिल दादा पाटील आणि जयदुर्गा ग्रुपचे सदस्य विशेष उपस्थित होते.
वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांचा गौरव
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिस्तबद्ध कवायत, संचलन, देशभक्तीपर नृत्ये, भाषणे आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments