नगरपरिषद महानगरपालिका कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश – जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व फलक अनावरण सोहळा उत्साहात संपन्न
. जळगाव, दि.23 जुलै प्रतिनिधी : नगरपरिषद महानगरपालिका कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या वतीने आयोजित कार्यकारिणी पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार मा. श्री. सुरेश (राजूमामा) भोळे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर मा. सौ. दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी उपमहापौर मा. श्री. मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती मा. डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मा. श्रीमती सिंधुताई कोल्हे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मा. श्री. प्रभाकर बाणासुरे , संघटनमंत्री मा. श्री. बाळासाहेब भुजबळ, ज्येष्ठ कार्यकर्ते मा. श्री. पी. जे. आप्पा पाटील तसेच जिल्हा सचिव मा. श्री. सचिन लाडवंजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचारी हित, संघटन बळकटी, कर्मचारी कल्याण तसेच महानगरपालिकेच्या विकासासाठी प्रशासन व कर्मचारी यांच्यात समन्वयाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात कर्मचारी संघटनेची भूमिका, प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी जळगाव शहर महानगरपालिका शाखेचे अध्यक्ष श्री. गौरव सपकाळे, कार्याध्यक्ष श्री. समीर बोरोले, सचिव श्री. गौरव पुराणिक, उपाध्यक्ष श्री. अतुल पाटील, सहसचिव श्री. महेश ठाकूर, मुख्य सल्लागार श्री योगेश बोरोले, सल्लागार श्री योगेश वाणी,कोषाध्यक्ष श्री. शुभम कोतकर, प्रसिद्धी प्रमुख श्री. आकाश जगताप, संघटक श्री संजय ठाकूर, श्री चंद्रशेखर तायडे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, कर्मचारी व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment