ad headr

Powered by Blogger.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप जळगाव जिल्हा महानगरा तर्फे 1000 रक्तदान करण्याचा संकल्प’ जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी

        


जळगाव  दि. २१ जुलै  ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व जनसामान्यांच्या मनातील देवा भाऊ प्रगतिशील मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी राज्यभर रक्तदान महाअभियान आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाअंतर्गत भाजप जळगाव जिल्हा महानगराच्या 5 मंडळांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 1000 रक्तदान करण्याचा संकल्प जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या महा रक्तदान करण्याचे आवाहन अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले असून जळगाव महानगरातील विविध मंडळांमार्फत सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिरे होणार आहेत.
 आ सुरेश भोळे (राजू मामा ) जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमालाताई काळे,व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळ क्र 1 छत्रपती शिवाजी महाराज मंडळ डी.बी. जैन हॉस्पिटल, येथे मंडळ क्र 2 संत झेलेलाल व बहीणाबाई मंडळ चेतनदास हॉस्पिटल, येथे मंडळ क्र 3 सरदार वल्लभभाई पटेल मंडळ मुस्कान लॉन,MIDC परिसर, येथे मंडळ क्र 4 प्रभू श्रीराम अयोध्यानगर शाळा क्र. ५०, संभाजी कॉलनी येथे, तर मंडळ क्र 5 महाराणा प्रताप मंडळात शाळा क्र. ४८, पिंप्राळा येथे उपस्थित आयोजित करण्यात आले असून या भव्य रक्तदान महाअभियानासाठी मंडळांचे अध्यक्ष आनंद सपकाळे,दिपमाला काळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी अध्यक्ष, अभियान प्रमुख तुषार सूर्यवंशी, ऋषिकेश शिंपी,तेजस काटे,ताराबाई पटेल डॉ विरेन खडके, दिपक बाविस्कर, रतन सारस्वत, उमेश सुर्यवंशी हे असुन तसेच रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी नियोजनात सहभागी झाले असून, सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजाप्रती सेवा भावना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या या सामाजिक उपक्रमात जळगावकर नागरिकांनी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक पितांबर भावसार, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी भारतीताई सोनवणे राहुल वाघ नितीन इंगळे जयेश भावसार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर व आयोजकांनी केले आहे.

No comments