अमळनेर येथे उद्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'
अमळनेर दि २४ जुलै. ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता, इंदिरा भवन (स्टेट बँकेच्या मागे), अमळनेर येथे पार पडणार आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे शिबिर आयोजित केले जात आहे.
प्रमुख उपस्थिती
अध्यक्षता: मा. आमदार श्री. अनिल भाईदास पाटील
विशेष उपस्थिती: मा. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी व विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Post a Comment