भडगाव येथे श्री शनैश्वर महाराज यात्रोत्सव शनिवारी
भडगाव दि. 15 [ प्रतिनिधी ] सुभाष ठाकरे
येथील शनि मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्री शनैश्वर महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून, यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
यात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. १८ मे २०२६ आणि बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता जाहीर कीर्तन कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे. सोमवारच्या कार्यक्रमात भागवताचार्य ह. भ. प. धनश्रीताई शिंदे (भडगाव) यांचे कीर्तन होणार असून, बुधवारच्या दिवशी कीर्तनकार ह. भ. प. कबीर अतार महाराज (कोल्हापूर) यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
भाविकांनी श्री शनि महाराज यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा तसेच कीर्तन कार्यक्रमास उपस्थित राहून धार्मिक वातावरणाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक श्री शनैश्वर पंच मंडळ, भडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच दिवशी श्री शनी जयंती असुन शनी आमावस्या देखील आहे. हा योग १३ वर्षानंतर आलेला आहे.
Post a Comment