🔴🔴शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला अमळनेर मध्ये लागली भ्रष्टाचाराची कीड!... 🔴🔴लाखोंची गाठोडे घेऊन ना-लायक, तथा बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्था चालकांची येते चीड.. . .
अमळनेर दि.26 (प्रतिनिधी)जळगाव जिल्हा सहित संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेला दोन वर्षापासून शालार्थ आयडी घोटाळा व त्याच्या चौकशीचा ससेमीरा अमळनेर शहर व तालुक्यातील अनेक शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. गरीब होतकरू गुणवत्ताधारक हजारो लाखो विद्यार्थी बेरोजगार फिरत असून ज्यांना स्वतःचे इंग्रजी मध्ये नाव लिहिता येत नाही असे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बोगस भरती अमळनेर मध्ये झालेली आहे. कारण त्यांच्याकडे संस्था चालकांना देण्यासाठी लाखो रुपयांचे गाठोडे होते. भ्रष्टाचाराचा विकोप जळगाव जिल्ह्यामध्ये एवढा वाढला की घर सोडून लपत फिरावे लागत आहे .तर काही महाभाग दोन दोन वर्षापासून कारागृहात आहेत. त्यांच्यावर पैसे घेऊन बोगस शिक्षक भरती करण्याचा आरोप आहे.
नाशिक येथील विशेष तपास पथक अर्थात एस आय टी चे प्रामाणिक अधिकारी या बेकायदेशीर भरती प्रक्रियेचा तपास करीत आहेत त्यासाठी त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून म्हणजे 2010 ते आज पर्यंत शाळेतील मुख्याध्यापकांचे व संस्थाचालकांची दप्तर तपासणी सुरू केली आहे. शिक्षक शिक्षकेतर भरती कोणत्या अनुषंगाने केली? किती जागा होत्या? अनुशेष भरला की नाही ?,बिंदू नामावली, भरती प्रक्रिया राबवताना कोणत्या दैनिकात जाहिरात दिली? शिक्षक शिक्षकेतर भरती प्रक्रिया राबवताना त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रतेची पूर्तता होती का? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेले पण लाखोंची गाठोडे देणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरले तर नाही ना? असे एक नाही तरअनेक प्रश्नांची उत्तरे सापडण्यासाठी प्रत्येक शाळेतून अहवाल मागवण्यात येत आहेत.
अमळनेर तालुक्यातील 25 शाळांच्या मागे या अहवाल तपासणीची टांगती तलवार डोक्यावर लटकत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या संस्थाचालकांनी नको तेथे नको तेवढा भ्रष्टाचार करून ठेवला. त्यांनी नीती शून्य ,अतात्विक पद्धतीने वारे माप लूटमार केली ज्या संस्था चालकांची चीड आल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांना कायद्याचा धाक उरला नव्हता असे सिद्ध होते. परंतु आता कारागृहात किंवा स्वतःला कारागृहात जाण्यापासून रोखण्यासाठी बेपत्ता व्हावे लागत आहे. असो तूर्तास आता फक्त एवढेच, विशेष तपास पथकाने चौकशी आंती घेतलेल्या निर्णयाकडे आणि चौकशी आणती काय काय समोर येते आणि यास त्यामध्ये कोण कोण सामील आहेत याकडे,संपूर्ण महाराष्ट्राचे तसेच जळगाव जिल्ह्याचे आणि अमळनेर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. कारण अंमळनेर तालुक्यातील सर्वाधिक शाळांचा तपास अहवाल मागवण्यात आला आहे. हे सर्व संताप जनक आहे. हे सर्व प्रकरण आणि त्या प्रकरणांमध्ये सामील झालेल्या प्रत्येक जण व त्यांना पाठीशी घालणारे वरच्या फळीतील स्वयंघोषित नेते ,यांना याची शिक्षा मिळाली पाहिजे अशी चर्चा सुरू आहे.
Post a Comment