ad headr

Powered by Blogger.

भडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश भंडारी यांची सलग नवव्यांदा बिनविरोध निवड

      भडगाव दि.22 ( प्रतिनिधी) सुभाष ठाकरे. तालुका औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश भंडारी यांची सलग नवव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
        यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी किरण पाटील, उपाध्यक्षपदी राहुल ओस्तवाल व जगदीश सोनवणे, सचिवपदी संजय पाटील, सहसचिवपदी महेंद्र चौधरी, शहर अध्यक्षपदी हर्षल चौधरी तर खजिनदारपदी धनंजय वाणी यांची निवड झाली.
     जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आसिफ मिर्झा व दिपक पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून विशाल पाटील (कोठली), मोहन भोई (वडगाव), हर्षल महाजन (कजगाव), सतीश महाजन (कोळगाव), दिपक बागुल (वडजी), सुहास महाजन (गुढे) आणि अनिश जैन (भडगाव) यांची निवड झाली. संघटनेच्या सल्लागार समितीमध्ये महेश पाटील, दिलीप राका व सुनील चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला युथ विंगच्या अध्यक्षपदी सौ. प्रेरणा प्रतापराव पाटील तर युथ विंग अध्यक्षपदी मयुर नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments