ad headr

Powered by Blogger.

🔴गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत आदर्श गुरूकूल राज्यात प्रथम साने गुरूजी निवासी माध्यमिक विद्यालय जिल्हास्तरावर, 🔴श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल तालुकास्तरावर तर अ. ध. चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ग्रामीणस्तरावर प्रथम.

        जळगाव दि. 23 (प्रतिनिधी).
"सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती ही केवळ पुस्तकात वाचण्याची किंवा व्यासपीठावरून सांगण्याची तत्त्वे नाहीत, ती रोजच्या जगण्यात आचरणात आणायची असतात.  प्लास्टिक जाळल्याने कॅन्सरसारखे भयंकर आजार पसरतात, तर जैविक कचऱ्यापासून सोनं बनवणारे खत तयार होते. हीच जाणीव आणि स्वच्छता ही सवय न राहता विद्यार्थ्यांच्या रक्तात संस्कार म्हणून रुजली पाहिजे," असे मनस्वी प्रतिपादन डॉ. शिल्पा नारायणन यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित आणि जैन इरिगेशन प्रायोजित ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६’ च्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
डिजिटल कचरा हा नवा भस्मासुर — अशोक जैन
अध्यक्षीय भाषणात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर बोट ठेवले. "सोशल मीडियाचे व्यसन आणि डिजिटल कचरा हा आजच्या पिढीपुढील सर्वात मोठा धोका आहे. शिक्षणात प्राथमिक स्तरावरच स्वच्छता आणि वाहतुकीच्या नियमांचा समावेश व्हायला हवा," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर
 जळगाव मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी या उपक्रमाला "देश परिवर्तनाची प्रयोगशाळा" असे संबोधले.
महाराष्ट्रातील विजेत्या शाळांची ‘गोल्डन लिस्ट’
महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधील हजारो शाळांमधून कसून केलेल्या मूल्यांकनानंतर निवड झालेल्या विजेत्या शाळांची यादी खालीलप्रमाणे:
स्तर / विभागपारितोषिकविजेत्या शाळेचे नाव व पत्ता
महा-राज्य स्तरप्रथम (₹ १ लाख)आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव (कोल्हापूर)
जिल्हास्तरप्रथम (₹ ५१ हजार)साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, केज (बीड)
द्वितीय (₹ ३१ हजार)लोणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुंढवा (पुणे)
तृतीय (₹ २१ हजार)भारतीय जैन संघटना माध्यमिक विद्यालय, पिंपरी (पुणे)
उत्तेजनार्थ (₹ ११ हजार)अनुभूति इंग्लिश मिडियम स्कूल, जळगाव
तालुकास्तरप्रथम (₹ ५१ हजार)श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर (नंदुरबार)
द्वितीय (₹ ३१ हजार)सरस्वती विद्या निकेतन, खानापूर (अमरावती)
तृतीय (₹ २१ हजार)ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव
उत्तेजनार्थ (₹ ११ हजार)दलवाई हायस्कूल, मिरजोळी (चिपळूण, रत्नागिरी)
ग्रामीणस्तरप्रथम (₹ ५१ हजार)अ. ध. चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, डोंगर कठोरा (जळगाव)
द्वितीय (₹ ३१ हजार)शाहबाबू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातूर (अकोला)
तृतीय (₹ २१ हजार)ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, पेठ वडगाव (कोल्हापूर)
उत्तेजनार्थ (₹ ११ हजार)भारतीय जैन संघटना माध्यमिक विद्यालय, वाघोली (पुणे)
दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात सहभागी शाळांच्या उपक्रमांचे चित्तवेधक व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. प्रशांत सूर्यवंशी यांनी गायलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने कार्यक्रमात अध्यात्मिक रंग भरले. गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर चंद्रशेखर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments