ad headr

Powered by Blogger.

पिंपळगाव बु. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड!

​        भडगाव: ( प्रतिनिधी )  सुभाष ठाकरे. तालुक्यातील पिंपळगाव बु. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी प्रवीण बळीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तत्कालीन चेअरमन शांताराम पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी संस्थेच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
​सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत विद्यमान संचालक प्रवीण बळीराम पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड घोषित केली.

नवनिर्वाचित चेअरमन प्रवीण पाटील हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण पिंपळगाव पंचक्रोशीत तसेच राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.
​    या महत्त्वपूर्ण निवड प्रसंगी संस्थेचे सर्व संचालक आणि गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शांताराम पाटील, ईश्वर परदेशी, आनंदा पाटील, शंकर परदेशी, भरत परदेशी, अरुण पाटील, नारायण पाटील, राजेंद्र पाटील, सुपडू पाटील, जयाबाई पाटील, कलाबाई पाटील, पोपट सूर्यवंशी या सर्वांनी नवनिर्वाचित चेअरमन प्रवीण पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव जगदीश बाविस्कर आणि शिपाई सुभाष पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

No comments