ad headr

Powered by Blogger.

पाटचारीचा प्रश्न मार्गी लागणार, तहानलेली शेती सुजलाम सुफलाम होणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काम मार्गी लावण्याचे दिले आश्वासन.

भडगाव : परिसरातून जामदा डावा कालवा वाहत असून यांचा फायदा फारच कमी शेतीला होत असल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्यापासून तहानलेले आहे. नालबंदी गावापासून पाटचारी काढल्यास पळासखेडे, महिंदळे, टिटवी, चोरवड, भोंडन या गावातील ५६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन परिसरातील पाण्यावाचून तहानलेली शेती ओलिताखाली येईल व परिसराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटेल. 
   परिसरातील शेतकऱ्यांनी जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार अमोल पाटील आमदार किशोर पाटील यांना पाटचारीसाठी वेळोवेळी दिलेल्या निवेदनाची दखल घेत व छोटुभाई पाटील यांच्या अधक प्रयत्नाने गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा पार पाडला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमण ध्वनीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत पाठचारीचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
    जानेवारी महिन्यातच विहिरी तळ गाठतात त्यामुळे हाती येणारे पिके वाया जातात. शेतीसाठी केलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत आहे. पाणी जवळून वाहत आहे. तरीही पिके सुकत आहेत. त्यामुळे परिसरातून पाटचारी काढल्यास दिवसेंदिवस नापिकी होत चाललेली जमीन ओलिताखाली येईल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
    पाटचारीचा होईल दुहेरी फायदा.
   महिंदळे पासून दोन किमी अंतरावर असलेल्या नालबंदी गावापासून पाटचारी काढल्यास पळासखेडे शिवारातून महिंदळे गावापासून जवळच टिटवी शिवारात पाचपांडव देवस्थान येथून पारोळा व एरंडोल तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या अंजनी नदीचा उगम आहे. या नदीत पाणी सोडल्यास टिटवी, चोरवड, भोंडण या गावातील हजारो हेक्टर क्षेत्राला फायदा तर होणारच आहे. परंतु नदी थडीवरील अनेक गावांना या पाण्याचा फायदा होणार असून उर्वरित पाणी धारागीर धरणात जाईल त्यामुळे धरण पुनरभरन होण्यास मदत होईल.
   यावेळी छोटुभाई पाटील, महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार माजी आयुक्त व्हि. डी. पाटील, पाट बंधारे विभागाचे अभियंता भोसले, विनोद पाटील, कुलदीप पाटील, सुशांत व्यास, हर्षल पाटील., माजी जि. प. सदस्य डॉ. हर्षल माने, माजी सभापती सुदाम पाटील सागरभाई पाटील, राकेश पाटील, नाना पाटील, रावसाहेब पाटील, दिनेश पाटील, उदय पाटील, समाधान मगर, बापूजी पाटील, दिपक पाटील, व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

No comments