ad headr

Powered by Blogger.

🔴 सोनी सनमाइका ते कांडप केंद्र मिरचीचे. 🔴अतिक्रमणामुळे भानगडी होणे नित्याचे.. 🔴 नगर.पा. सत्ताधारी आणि प्रशासनाचे.,. 🔴तीन/तेरा वाजले विस्कळीत कारभाराचे..

अमळनेर दि. 22 [ प्रतिनिधी ] येथील लुल्ला मार्केट मधील दुकानांची रचना म्हणजे मुंबई पुण्याच्या बाजाराला लाजवेल असे मार्केट उपलब्ध आहे. अत्युच्च प्रतीचे विविध प्रकारचे कपड्यांची मोठी मोठी दुकाने. तसेच मोबाईल शोरूमआणि ज्वेलरीची दुकाने थाटात उभी आहेत. अंमळनेर तालुक्यातील खरेदीदार या मार्केटमध्ये कपडे घेणे साठी गर्दी करत असतात. परंतु सोनी सनमाइका ते मिरची कांडप केंद्र या गल्लीमध्ये पायी चालणाऱ्यांना आणि वाहनधारकांना कसरत करावी लागते. तेथे लावलेल्या दुचाकी आणि अतिक्रमणामुळे वाहनधारकांमध्ये नेहमीच तुंबळ हाणामाऱ्या दृष्टीस पडतात. परंतु हे सर्वे नित्याचे झाल्यामुळे कोणीही तक्रार दाखल करत नाही किंवा या अतिक्रमणाबाबत आवाज उठवत नाही.
 मिरची कांडप केंद्रावर झालेला दंगा आणि तो दंगा शांत करण्यासाठी पोलीस फायरिंग मध्ये झालेली निरपराध पारधी समाजाच्या व्यक्तीची हत्या, हे सर्व आम्ही अमळनेर करांनी अनुभवलेले आहे, त्यावर काही राजकारण्यांनी व व्यापाऱ्यांनी भाजलेल्या पोळ्या, त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षकांची झालेली गच्छंती. हे जणू कालच घडलेल आहे असे त्या गर्दीवरून वाटते. मिरची कांडप केंद्रावरील असलेल्या विविध गिरण्यांच्या प्रदूषणामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिंका, डोळ्यांची आग आणि अंगाची जळजळ होते. हे सर्व सहन करता खरेदीदार येथे फिरत असतात परंतु त्या अतिक्रमणामुळे प्रत्येक वेळा तिथे वादावादी होतात. प्रशासनाच्या विस्कळीत कारभाराचा तो सगळ्यात मोठा नमुना आहे. रस्त्यावर थाटलेले कपड्यांचे दुकान, इकडे असलेले पाणीपुरी विक्रेत्या मुळे अतिक्रमण प्रत्येक दुकानांपुढे लावलेल्या वाहनांच्या बेशिस्त पार्किंग याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक डोळेझाक केलेली दिसते. अर्थात त्यामुळे येणारा जाणाऱ्या वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांची खटके उडतात , आणि परिणामी तोडफोडी होतात. कोणाची डोके फोडतात, यावर लवकरात लवकर उपाययोजना करून प्रवाशांना सोनी सन्माईका ते मिरची कांडप केंद्रापर्यंत रस्ता सुरळीत करावा अन्यथा पुन्हा एखादा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. अमळनेरचे अतिक्रमण पथक नुसते नावाला आहे काय? असे नागरिकांचे मत आहे.

No comments