🔴आगामी अमळनेर तालुका शेतकरी सह.संघ निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी अंमळनेर काँग्रेस कमिटीचे शेतकरी पॅनल सज्ज होणार.. 🔴 अमळनेर टाऊन हॉल येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
अमळनेर[ प्रतिनिधी] तालुका काँग्रेस कमिटीची बैठक काल दिनांक 6/ 5/ 26 रोजी संध्याकाळी ४.३० वाजता अमळनेर टाऊन हॉलमध्ये संपन्न झाली. विषय होता अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक! संघ निवडणूक प्रक्रिये नुसार पाच तारखेला अर्जाची छाननी झाली. जवळपास बहुतांश नामांकन वैध ठरले. मतदार संघनिहाय यादी देखील जाहीर झाली. त्या अनुषंगाने, बैठकीत ज्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे, शेतकी संघ निवडणुकीत भाग घ्यायचा, त्यांनाच बोलावले होते. जवळपास ३० ते ३५ निवडणूक नामांकन अर्ज भरणाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत एक सुकाणू समिती नेमण्यात आली.
त्यात तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी.के सूर्यवंशी, माजी प.स. सभापती धनगर दला पाटील, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश पीरण पाटील, अमळनेर मार्केट कमिटी संचालक प्रा. सुभाष पाटील, माजी तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील आणि या सर्वा ना जोडणारे प्रा. शाम पवार यांचा सर्वानुमते समावेश करण्यात आला. सर्वप्रथम उमेदवारी कशासाठी करावयाची? यावर श्री संदीप सैंदाणे, दिनेश पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, तुकाराम चौधरी, बन्सीलाल भागवत, गोकुळ पाटील, सौ गीतांजली घोरपडे यांनी विचार मांडले. नंतर प्रा. सुभाष पाटील, सुरेश दादा पाटील, धनगर अण्णा पाटील, विनोद राजधर पाटील, भागवत सूर्यवंशी यांनी निवडणुकीतील वास्तवता उपस्थितांना कथन केली. त्यात निवडणुकीत खर्च अनिवार्य आहे. निवडणूक निष्ठेने एक दिलाने लढली पाहिजे, मतदार यादीतील मयत संख्या जास्त असल्याने बोगस मतदानावर लक्ष केंद्रित करणे अगत्याचेआहे.
तसेच मतदान ज्या भागाचे आहे, त्याच भागातील पुलिंग एजंट नेमणे प्रभावी ठरते, मतदानासाठी मतदार बुथवर आणण्याची यंत्रणा, या सर्व मुद्द्यावर मौलिक विचार मांडले. सर्वांच्या चर्चेनंतर काँग्रेस पक्ष पॅनलला "शेतकरी पॅनल नाव" देण्याचे एक मताने ठरले. प्रचारासाठी कमी कालावधी मिळत असल्याने, येत्या 11
तारखेला, अमळनेर येथील विजय मारुती मंदिरावर प्रचार नारळ वाढवून, प्रचाराला सुरुवात करण्याचे ठरले.
पॅनल तयार करणे सुकर व्हावे म्हणून, सुकाणू समितीवर भरवसा ठेवून, स्वखुशीने, उपस्थितानी माघारीचे अर्ज सहीनिशी समितीकडे सुपूर्त केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून, नेमलेल्या तालुका सेवा दल अध्यक्ष बन्सीलाल भागवत व शहर सेवादल अध्यक्ष भिकाजी रामचंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत सर्वश्री प्रताप पाटील, मनोज पाटील, प्रा विश्वनाथ ठाकरे, त्र्यंबक पाटील, सुरेश कदम, प्रवीण जैन, रोहिदास पाटील, छोटू नाना , भिवसन पाटील,यांची उपस्थिती होती. अगदी खेळीमेळीच्या, आनंदमय वातावरणात, भारतीय बैठकीत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिंदाबाद, अमळनेर काँग्रेस जिंदाबाद च्या घोषणा देत कार्यक्रमाची संध्याकाळी ७.०० वाजता सांगता झाली. सूत्रसंचालन प्रा. शाम पवार यांनी केले.
Post a Comment