ad headr

Powered by Blogger.

अमळनेर नगर परिषदेत ‘नमस्ते दिवस’ उत्साहात साजरा; कर्मचार्यांना PPE कीट व आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप .

अमळनेर .( प्रतिनिधी ) केंद्र शासनाच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) अभियानांतर्गत ‘नमस्ते दिवस’ निमित्त अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी इंदिरा गांधी भवन येथे कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे आयोजन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. श्री. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव व स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे यांनी उपस्थित राहून उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेत तसेच घनकचरा व्यवस्थापन कामात घंटागाडी चालक , वाहक व प्रक्रिया केंद्र वरील कार्यरत कर्मचार्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व कल्याणासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, असे सांगितले.
या उपक्रमांतर्गत सर्व कर्मचार्यांना नमस्ते योजने बद्दल माहिती देण्यातआली. तसेच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व महिला व पुरुष कर्मचारी यांना नमस्सुते योजने अंतर्गत प्राप्त सुरक्षा साहित्य (PPE kit) आरोग्य सभापती श्री रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री संतोष जाधव , स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे व  शहर समन्वयक श्री. गणेश गढरी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी अमळनेर नगरपरिषदेचे आभार व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढून स्वच्छता सेवेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच अमळनेर  शहरातील विविध भागात जे कचरा वेचक आहे अश्या नागरिकांनी स्वच्छता विभागात संपर्क करून नमस्ते योजने अंतर्गत नाव नोदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी योगेश पवार, श्यामराव करंदीकर, महेंद्र बिऱ्हाडे, अनंत संदानशिव, युनस शेख ई. सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments