ad headr

Powered by Blogger.

आदिवासी संशोधन विधेयक' विरोधात उद्या आझाद मैदानावर एक दिवशीय निषेध धरणे आंदोलन


मुंबई
         राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या 'आदिवासी संशोधन विधेयका'मुळे कोळी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत,वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ति सामाजिक संस्था, धुळे' आणि समस्त आदिवासी कोळी बांधवांच्या वतीने या कायद्याच्या विरोधात मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवशीय निषेध धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. '

अशा आहेत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या 
काळा कायदा रद्द करण्याची मागणी: ९ जुलै २०२६ रोजी मंजूर करण्यात आलेले आदिवासी संशोधन विधेयक हे कोळी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे आणि अन्यायकारक 'काळे बिल' असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी पत्राद्वारे केला आहे. हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.
१९५० पूर्वीच्या नोंदी ग्राह्य धरण्याची मागणी: कोळी बांधवांना सहजतेने ST प्रमाणपत्र (अनुसूचित जमाती प्रमाणपत्र) मिळावे यासाठी १९५० पूर्वीच्या कोळी नोंदीचा आणि रहीवाशी पुरावा ग्राह्य धरून तात्काळ परिपत्रक प्रसिद्ध करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
समाजात नैराश्याची भावना: सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी (२८), महादेव कोळी (२९) आणि मल्हार कोळी (३०) या समस्त कोळी जमातींमधील बांधवांमध्ये तीव्र असंतोष व नैराश्याची भावना पसरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे आंदोलन मंगळवारी आझाद मैदानावर शांततेच्या मार्गाने केले जाणार असून, राज्यभरातून कोळी समाजाचे प्रतिनिधी व समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

No comments