भडगावच्या प्रभाग क्र. ८ मध्ये काँक्रिट रस्त्याचे थाटात भूमिपूजन; विकासाची आणखी एक भक्कम पायाभरणी!
भडगाव . दि 18 जुलै ( प्रतिनिधी ) सुभाष ठाकरे
शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांची अनेक दिवसांची दळणवळणाची अडचण आता दूर होणार आहे. बाळद रोड लगत असणाऱ्या एकवीरा नगर ते तळणी तलाव यांना जोडणाऱ्या नव्या काँक्रिट रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या नव्या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार, आधुनिक आणि सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार असून प्रभागाच्या विकासाला एक नवी गती मिळणार आहे.
"भडगाव शहराचा सर्वांगीण विकास करणे हाच आमचा मुख्य संकल्प असून, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न असेच कायम राहतील," अशी ग्वाही यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिली.
या नव्या काँक्रिट रस्त्यामुळे परिसराचा कायापालट होणार असल्याने एकवीरा नगर व तळणी तलाव परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी भडगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मा.सौ. रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष मा. राजेंद्र जिभू पाटील तसेच शिवसेना गटनेते मा. लखीचंद भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, प्रभाग क्र. ८ च्या नगरसेविका सौ. समीक्षाताई पाटील, नगरसेवक युवराज पाटील, जगन भोई, देवा आहिरे यांच्यासह डॉ. विजयकुमार देशमुख, डॉ. प्रमोद पाटील, जितेंद्र आचारी, विजयकुमार भोसले, आबा चौधरी, जहांगीर मालचे, राहुल ठाकरे, नाना हाडपे, महेंद्र ततार, मिलिंद बोरसे, दिपक सोनार, नयन भोसले आदि मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"विकासाची वाट… जनतेच्या विश्वासातून!"
Post a Comment