ad headr

Powered by Blogger.

रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने महिलेची छेडछाड; जळगावात 'त्या' सुनील पाटीलला भरचौकात चोप!


​जळगाव दि 10 ( प्रतिनिधी )
रेशन कार्ड बनवून देण्याच्या बहाण्याने एका हतबल महिलेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला जळगाव तहसील कार्यालयाजवळ महिलांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. "पैशांची चिंता करू नको, मला फक्त एकदा..." असे म्हणत महिले कडून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या संशयित सुनील बाळू पाटील (रा. देऊळवाडा ता. जि. जळगाव) याला पीडित महिलेने आणि उपस्थित नागरिकांनी भरचौकात चांगलाच धडा शिकवला.
​ सविस्तर वृत्त असे की 
​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या १० वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत असून सध्या भावासोबत राहत आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे आपले आणि वडिलांच्या नावाचे रेशन कार्ड बनवण्यासाठी ती १ जुलै रोजी जळगाव तहसील कार्यालयात आली होती. तिथे तिला एका दलालाच्या माध्यमातून सुनील पाटील नावाच्या व्यक्तीचा संपर्क मिळाला. काम करून देण्याच्या बहाण्याने सुनीलने तिचा मोबाईल नंबर घेतला.
​ *मदतीचा बहाणा आणि व्हॉट्सॲपवर मेसेजचा ससेमिरा* 
​पीडितेने तिच्या कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितल्यावर संशयित सुनील पाटील याने तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. "मी रोज भरपूर पैसे कमवतो, तुम्हाला काम करायची गरज नाही, मी पैसे देत जाईन," असे आमिष दाखवून तो रोज तिला व्हॉट्सॲपवर 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट'चे मेसेज पाठवून त्रास देत होता. ९ जुलै रोजी त्याने भुसावळ तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या कामासाठी जाण्याचे नियोजन केले.
 *​...आणि चहाच्या टपरीवर पाप उघड झाले!* 
​१० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास सुनील पाटील याने पीडितेला तहसील कार्यालयाजवळील एका चहाच्या टपरीवर भेटायला बोलावले. "भुसावळला जाण्याआधी आपण आधी रूमवर जाऊ," असे तो पीडितेला म्हणाला. महिलेने रूमवर जाण्याचे कारण विचारले असता, सुनील पाटील याने अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठत, "पैशांची चिंता करू नको, मी तुला हवे तेवढे पैसे देईल, वेगवेगळ्या ...
चे भरपूर पैसे मिळतील, मला फक्त एकदा ......दे," असे म्हणून तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केला.
​ *रणरागिणीचा अवतार; जमावानेही दिला चोप* 
​सुनील पाटीलचे हे अश्लील वक्तव्य ऐकताच पीडित महिलेच्या संतापाचा कडेलोट झाला. तिने कसलाही विचार न करता भरचौकात त्याला जोरदार चापटी लगावली. हा प्रकार पाहताच आसपासच्या महिला आणि नागरिक धावून आले. परिस्थिती समजताच उपस्थित संतप्त महिलांनीही सुनील पाटीलला चपलेने आणि हाताने चांगलाच चोप दिला.
​   या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, शासकीय कार्यालयांच्या बाहेर फिरणाऱ्या अशा संशयास्पद दलालांवर आणि विकृत मानसिकतेच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पीडितेने या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन जळगाव कायदेशीर तक्रार BNS 2023 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

No comments