🔴🔴 अमळनेर मध्ये जोरात सुरू रेती उत्खनन...!ओव्हरलोड वाहतूक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून...!
अमळनेर दि. 02 (प्रतिनिधी) येथे सखाराम महाराज यात्रोत्सव सुरू असून सुद्धा बेकादेशीर वाळू वाहतूक जोमाने सुरू आहे.
वाळू वाहतूकदारांना कोणाचे अभय आहे. हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाळू डंपर मुळे तीन निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. रेती लिलाव गटामधून रेती उचल एका नंबर मध्ये जर चार ब्रास असेल. तर त्यांच्यामध्ये अतिरिक्त वाळू दोन-तीन ब्रास अधिक असते.आणि अशा वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण होतात.
जशी की गाडीचा टायर फुटणे, चालकाचा गाडीवरून ताबा सुटणे, अतिरिक्त वजनामुळे गाडीचा तोल जाणे. यामुळे रस्त्यावरील इतर प्रवाशांना त्रास होतो. प्रसंगी अनेक वेळा अपघात होतात. हे सर्व सुरू असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी गप्प का हा नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे.
अमळनेर मधील जागृत नागरिकांनी रेती वाहतूक बंद व्हावी म्हणून आंदोलने मोर्चे काढले परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. याचा अर्थ रेती वाहतूक दारानी कायदा आणि सुव्यवस्था आपल्या खिशात घातला आहे अशी प्रतिक्रिया येत आहे.
Post a Comment